सातारा-जिल्ह्यातील परदेश प्रवास करुन आलेले 16 नागरिक आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले 3 नागरिक अशा एकूण 19 नागरिकांना अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी याबाबत माहिती दिली.
Coronavirus: सातारा जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे 19 अनुमानित दाखल - Corona virus
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात 19 जणाना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.यातील 16 जण परदेश प्रवास करुन आले आहेत तर 3 जण कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत. सातारा जिल्ह्यातील 2 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
16 नागरिक हे परदेश प्रवास करुन आलेले असून त्यामध्ये अंदाजे 20 ते 60 वर्ष वयोगटातील 14 पुरुष व 2 महिला आहेत. तसेच बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले 3 नागरिक अंदाजे 20 ते 60 वर्ष वयोगटातील महिला आहेत. त्यातील एका 40 वर्षीय महिलेस ताप, सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्याने या 19 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने 'एनआयव्ही पुणे' येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
शासकीय रुग्णालयातील यापुर्वीच्या 6 अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील आज अखेर कोरोना 19 बाबतची आकडेवारी
1. एकूण दाखल - 82
2. जिल्हा शासकीय रुग्णालय- 67
3. कृष्णा हॉस्पीटल, कराड- 15
4. कोरोना नमुने घेतलेले-82
5. कोरोना बाधित अहवाल -2
6. कोरोना अबाधित अहवाल -50
7. अहवाल प्रलंबित -30
8. डिस्चार्ज दिलेले- 50
9. सद्यस्थितीत दाखल- 32
10. आलेली प्रवाशी संख्या - 543
11. होम क्वारान्टीनमधील व्यक्ती - 543
12. पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती- 357
13. संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 46
15. यापैकी डिस्चार्ज केलेले- 15