महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काटेरी झुडपात आढळले नवजात अर्भक; म्हसवड येथील प्रकार - Boy Infant

सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील ज्ञानवर्धनी विद्यालयाच्या प्रांगणाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या काटेरी झुडपात एक पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळून आले आहे.

नवजात अर्भक

By

Published : Apr 7, 2019, 5:49 PM IST

सातारा - म्हसवड येथील ज्ञानवर्धनी विद्यालयाच्या प्रांगणामागील काटेरी झुडपात एक पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळून आले आहे. विद्यालयाच्या मागच्या बाजूस असलेल्या वडाच्या झाडाजवळ मोठ्या प्रमाणावर काटेरी वनस्पती आहे. त्यामुळे या ठिकाणी शक्यतो कुणीही फिरकत नाही. याचाच फायदा घेत येथे कुणीतरी पुरुष जातीचे एक दिवसाचे नवजात अर्भक आणून टाकले होते.

बाळाच्या अंगात मोठ्या प्रमाणावर काटे घुसलेले होते. त्यामुळे ते संबंधित व्यक्तीने लांबूनच टाकले असण्याची शक्यता प्रथमदर्शनी ज्यांनी हे अर्भक पाहिले त्यांनी व्यक्त केले आहे. या अर्भकाची माहिती मिळाल्यानंतर प्रथम या अर्भकाला पोलिसांच्या मदतीने म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर योग्य ते औषध उपचार केल्यावर त्यास पुढील उपचारासाठी सातारा येथील डॉ. क्रांतीसिंह नाना पाटील पाठविण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details