सातारा - सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ४४० नागरिकांच्या तपासणीअंती १७८ जणांना काेविड १९ ची लागण (Corona Cases in Satara) झाल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली. पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ लक्षात घेऊन प्रशासनाने चाचण्यांमध्ये वाढ केली आहे.
गेल्या ४-५ महिन्यांच्या विश्रांतीनंतर राज्यातील इतर शहरांबरोबरच सातारा जिल्ह्यात कोविडने डोके वर काढले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १७८ संशयित बाधित आढळले आहेत. जिल्ह्याचा पाॅझीटीव्हीटी रेट ५.१७ इतका आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे याबाबतची आकडेवारी प्रसिद्धीस दिली आहे.
६२० रुग्णांवर उपचार