सातारा - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले असतानाच कोरोनाबाधितांची संख्याही वाढत आहे. गुरूवारी दुपारी जिल्ह्यातील 4 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. रात्री पुन्हा 26 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्याने सातारा जिल्ह्याला धक्का बसला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.
साताऱ्यात आणखी 26 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्याची संख्या ४५२ वर
सातारा जिल्ह्यातील 4 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. गुरुवारी रात्री पुन्हा 26 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४५२ वर जाऊन पोहोचला आहे.
कराड आणि पाटण तालुक्यातील दोन आणि सातारा तालुक्यातील दोन, अशा चौघांचा कोरोना अहवाल गुरुवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा सातारा जिल्ह्यातील 26 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रशासनापुढील चिंता वाढली आहे. गुरुवारी कराड तालुक्यातील म्हासोली या गावातील तब्बल 8 जण कोरोनामुक्त झाले. परंतु, हा आनंद फार काळ टिकला नाही. रात्री पुन्हा कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली. आता सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 452 वर पोहोचली आहे.