सातारा -सध्या पावसात भिजत भाषण करत असतानाच्या एका नेत्याच्या फोटोने व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सर्व प्रकारच्या समाज माध्यमावर धुमाकूळ घातला आहे. हा फोटो कुण्या अभिनेत्याचा किंवा सेलिब्रीटीचा नाही. तो फोटो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा ! विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पवार यांनी सातारा येथे पाऊस सुरू असतानाच लोकांना संबोधित केले.
येत्या २१ तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साक्षात वरुणराजाने देखील आज आशीर्वाद दिले असल्याचे सांगत शरद पवार यांनी आपल्या भाषणाला जोरदार सुरुवात केली.