सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांनी दहिवडी येथे आज पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात विविध प्रश्नांवर चर्चा झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे उमेदवार संजय शिंदेनी घेतली प्रभाकर देशमुखांची भेट - भाजप
राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांनी दहिवडी येथे आज पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांची भेट घेतली.
फेब्रुवारी महिन्यात दोन्ही उमेदवार माण-खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांच्या घरी भेटले होते. त्यामुळे चर्चेला मोठे उधाण आले होते. मात्र, मोहिते-पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली. तर दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपची वाट पकडली. भाजपने त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या मतदारसंघात दोस्त दोस्त एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याने मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. तसेच या निवडणुकीत कोण विजयी होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.