सातारा- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ रहिमतपूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. पवारांवर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. नागरिकांनी बंदमध्ये सहभागी होत भाजप सरकारचा निषेध केला.
हेही वाचा - दुष्काळग्रस्त भागातील माण नदी परिक्षेत्रात पूर परिस्थिती;पावसाने शेतकरी सुखावला
सरकारने सूडबुद्धीने केलेली कारवाई भाजपला महागात पडेल, असा इशाराही आयोजकांनी यावेळी दिला. दरम्यान, फलटण शहरात ठिक-ठिकाणी बंद पाळण्यात आला. मात्र, काही ठिकाणी व्यापार पेठा दुपारनंतर चालू करण्यात आल्या होत्या. तर रहिमतपूरमध्ये मात्र कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
हेही वाचा - ...अन् उदयनराजे यांना रडू कोसळले
शहरातील अत्यावश्यक सेवा व सुविधा या बंदमधून वगळण्यात आल्या होत्या. बंद बाबतचे निवेदन रहिमतपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांना नगराध्यक्ष आनंदा कोरे व पदाधिकार्यांनी दिले होते.