सातारा :मतदान करताना पक्ष न पाहता माणूस पाहा. भ्रष्ट होऊ नका. मग तुम्हाला अपेक्षित असणारे राष्ट्र उभे राहिल, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर ( Veteran actor Nana Patekar ) यांनी युवा पिढीला दिला. मला चित्रपट क्षेत्रात पैसा, प्रसिध्दी मिळाली. परंतु, लोकांची कामे केल्यावर जो आनंद मिळतो त्या आनंदासाठी मी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले. रयत शिक्षण संस्थेच्या कराडमधील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये ( Sadguru Gadge Maharaj College in Karad ) आयोजित केलेल्या युवा महोत्सवात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना नाना पाटेकरांनी दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अॅड. रवींद्र पवार, प्राचार्य मोहन राजमाने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Nana Patekar : मतदान करताना पक्ष नको माणूस पाहा; नाना पाटेकरांचा तरूणांना सल्ला
मतदान करताना पक्ष न पाहता माणूस पाहा. भ्रष्ट होऊ नका. मग तुम्हाला अपेक्षित असणारे राष्ट्र उभे राहिल, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर ( Veteran actor Nana Patekar ) यांनी युवा पिढीला दिला. कराडमधील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये ( Sadguru Gadge Maharaj College in Karad ) आयोजित केलेल्या युवा महोत्सवात ते बोलत होते.
युवा पिढीकडून खूप अपेक्षा :माझे युवा पिढीवर भरपूर प्रेम असल्यानेच मी युवा महोत्सवाला आलो. तुमच्याकडून आम्हाला भरपूर अपेक्षा आहेत. त्या तुम्ही पूर्ण करा. आम्हाला तोंडघशी पाडू नका, असे आवाहन करून नाना पाटेकर म्हणाले, काय करायचे अन काय नाही करायचे हे तुमच्या हातात आहे. मोबाईल मी माझ्या सोयीसाठी वापरतो. तरूणांनी देखील मोबाईलच्या मोहजालात न अडकता पुस्तके वाचली पाहिजेत. पुस्तकाच्या दोन ओळींमधील जागा आपली आहे, हे लक्षात ठेवा. सध्या तंत्रज्ञान आवश्यक बाब असली तरी त्याचा किती वापर करायचा हे आपल्या हातात आहे.
जाती-धर्मात अडकविणारे सर्वात मोठे गुंड :आपणाला जाती धर्मात अडकवणारे लोकच समाजातील सर्वात मोठे गुंड आहेत. त्यांच्यापासून सावध रहा. जात-धर्म न पाळण्याची शपथ घ्या. त्याऐवजी एकमेकांना दिलेले शब्द पाळा.तुम्हा सर्वांना मतदानाचा हक्क मिळाला आहे. तेव्हा मतदान करताना भ्रष्ट होऊ नका. पक्ष न पाहता माणूस पाहून मतदान करा, असा सल्ला नाना पाटेकर यांनी नव मतदारांना दिला.चित्रपटसृष्टीत पैसा, प्रसिध्दी मिळाली. परंतु, लोकांची कामे केल्यावर जो आनंद मिळतो त्या आनंदासाठी मी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत आहे. कालच्या पिढीपेक्षा आजची पिढी अधिक सगज आहे. आज साधनांची सुबत्ता असली तरी तरूणांनी सोशल मीडियामध्ये गुरफटता कामा नये. मी राजकारणात पुर्वीच गेलो असतो, पण तेथे मला माझेपण टिकवता येणार नाही. याची जाणीव असल्यामुळे मी कधीच तो विचार केला नसल्याचे नाना म्हणाले.