सांगली - एका नागाने चक्क विषारी घोणस साप गिळल्याचा प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या बुधगावमध्ये हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Video: नागाने गिळला चक्क विषारी घोणस साप - गजानन जाधव
सांगलीतीव बुधगावमध्ये एका नागाने चक्क विषारी घोणस साप गिळल्याचा प्रकार समोर आला आहे.
सांगलीच्या बुधगाव कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या हक्के कॉलनी परिसरात सांबवेकर यांच्या घरामध्ये साप घुसला. याची माहिती गावातील सर्पमित्र गजानन जाधव यांना देण्यात आली. त्यानंतर जाधव यांनी तत्काळ सांबवेकर यांच्या घरी धाव घेतली. त्यांना त्याठिकाणी साडेपाच फुटाचा नाग आढळून आला. यावेळी त्याला पकडून वर उचलल असता त्याच्या तोंडातून दुसऱ्या सापाची शेपटी बाहेर आली. त्या नागापेक्षा कितीतरी पटीने जास्त विषारी असणारा ४ फूट लांबीचा घोणस जातीचा साप त्या नागाच्या तोंडातून बाहेर आला. हा प्रकार बघून उपस्थितांना धक्का बसला. मात्र, तो साप मृत झाला होता. सर्पमित्र जाधव यांनी मोठ्या धाडसाने या नागाला पकडून सुखरूप निर्जन ठिकाणी सोडले.