सातारा - समर्थ मंदिर येथील बालाजी अपार्टमेंटजवळ मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला.
धारदार शस्त्राने वार करून साताऱ्यात युवकाचा खून
एका युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. पूर्वीच्या वैमनस्यातून हा प्रकार झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
अज्ञाताने केले वार
बजरंग लक्ष्मण गावडे (वय 35, रा. बालाजी अपार्टमेंटमागे, मंगळवार पेठ) असे मृताचे नाव आहे. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. समर्थ मंदिर चौकाजवळ बालाजी अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंट शेजारून जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर, साधारण २५ फूट अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. दुचाकीवरून घरी जात असताना अज्ञाताने त्याच्यावर वार केल्याचे सकृतदर्शनी दिसते. रस्त्यावरच मृताची दुचाकी पडली होती. पूर्वीच्या वैमनस्यातून हा प्रकार झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.