सातारा -महामार्गावर वर्षभरापूर्वी झालेल्या आनेवाडी टोलनाका धुमश्चक्री प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले सुनावणीसाठीआज वाई न्यायालयात हजर झाले. उदयनराजे न्यायालयात उपस्थित राहणार असल्याने समर्थकांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
- आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन प्रकरण -
आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडे होते. हे व्यवस्थापन आपल्याकडे घेण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशील होते. टोलनाका व्यवस्थापन हस्तांतरावरुन उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्ये वाद होता. ६ ऑक्टोबर २०१७ कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आनेवाडी टोल नाक्याचा ठेका ताब्यात घेण्यावरून खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. जमावबंदीचा आदेश लागू असताना धुमश्चक्री झाली होती. त्यामुळे या परिसरातील वातावरण तापले होते. यावेळी टोल नाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
- जमावबंदीचा आदेश भंग केल्याप्रकरणी उदयनराजेंवर झाला होता गुन्हा दाखल
दरम्यान, जमावबंदीच्या आदेशाचे भंग केल्याप्रकरणी उदयनराजे व अन्य १५ जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. टोल नाक्यावर झालेला धुमश्चक्रीनंतर साताऱयात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या घरासमोर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला होता. त्यावेळी गोळीबारही झाला होता. या प्रकरणामध्ये उदयनराजेंचे कार्यकर्ते न्यायालयात हजर झाले होते. मात्र, उदयनराजे हजर झाले नव्हते. उदयनराजेंवर अनेक वेळा साक्षी समन्स बजावण्यात आले होते. यानंतर आज दुपारी खासदार उदयनराजे भोसले, अशोक सावंत, राजू गोडसे, बाळासाहेब ढेकणे, सनी भोसले, मुरलीधर भोसले, अजिंक्य भोसले, इम्तियाज बागवान, बंडा पैलवान, किरण कुऱ्हाडे आदी प्रमुख संशयितांसह स्वतः हून वाई न्यायालयात हजर झाले.
- पुढील सुनावणी ७ डिसेंबरला -