सातारा - जिल्ह्यात गेल्या 48 तासात कोरोना बाधितांचा आकडा कमालीचा वाढला आहे.रविवाारी रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात 1 हजार 16 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर 14 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
बाधितांची सर्वोच्च टक्केवारी -
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 432 रुग्णांना रविवारी संध्याकाळपर्यंत घरी सोडण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने चाचण्यांमध्ये दुपटीने वाढ केली आहे. रविवारच्या चाचण्यामधून बाधित येण्याचा दर 27.06 टक्के इतका सर्वाधिक निघाला आहे. हा गेल्या 7 महिन्यांतील सर्वोच्च दर आहे.