सातारा- दुबई येथून प्रवास करुन आलेल्या जिल्ह्यातील अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीला कोरोनाची बाधा झालेली नाही. तीचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला असून, कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली आहे.
साताऱ्यातील 'ती' चिमुकली कोरोना बाधित नाही; वैद्यकीय अहवालात स्पष्ट - corona latest news
सातारा जिल्ह्यातील सहा वर्षांच्या मुलीस अनुमानित म्हणून, विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. कोरडा खोकला असल्यामुळे तिच्या घशातील स्त्रावाचा नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. तिचा रिपोर्टही निगेटिव्ह आला असल्याने ही चिमुकली 'कोरोना' पासून सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

जनतेनी कोरोनाच्या बाबतीत भीती न बाळगता दक्ष रहावे, तसेच जिल्हा प्रशासन राबवत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.