महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Earthquake at Koyna Dam : कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का - Earthquake at Koyna Dam on 8th Jan 2022

कोयना परिसराला शनिवारी दुपारी भूकंपाचा धक्का ( Earthquake at Koyna Dam ) जाणवला. सौम्य भूकंपामुळे कोठेही पडझड झालेली नाही. तसेच कोयना धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा व्यवस्थापनाने दिला ( Earthquake at Koyna Dam on 8th Jan 2022 ) आहे.

कोयना धरण भूकंप
कोयना धरण भूकंप

By

Published : Jan 8, 2022, 5:27 PM IST

सातारा- कोयना धरण परिसर शनिवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास भूकंपाच्या सौम्य धक्क्याने ( Mild earthquake shakes Koyna Dam ) हादरला. भूकंप मापन केंद्रावर या धक्क्याची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली आहे.

भूकंपाने कोयना धरणाला धोका पोहोचला नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे.

हेही वाचा-Mega Block On Central Railway : मध्य रेल्वेवर 36 तासांचा मेगाब्लॉक सुरु.. हजारो कामगार झाले सहभागी

हेळवाकजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू...

कोयना परिसराला शनिवारी दुपारी भूकंपाचा धक्का ( Earthquake at Koyna Dam ) जाणवला. सौम्य भूकंपामुळे कोठेही पडझड झालेली नाही. तसेच कोयना धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा व्यवस्थापनाने दिला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून 8 किलोमीटर अंतरावरील हेळवाक गावाच्या नैऋत्येस 6 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली जमिनीखाली 4 किलोमीटर इतकी होती. कोयनानगर वगळता अन्यत्र भूकंपाचा हा धक्का जाणवला नाही.

हेही वाचा-Gulabrao Patil Vs Kirit Somaiya : किरीट सोमैय्यांनी बोलताना भान ठेवावे- गुलाबराव पाटील यांचा टोला

गतवर्षात १२८ भूकंपांची नोंद

कोयना धरण परिसरात २०२१ सालात सौम्य आणि अति सौम्य भूकंपाची मालिका सुरू होती. भूकंप मापन केंद्रावर मागील वर्षभरात तब्बल १२८ भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली. त्यामध्ये ३ रिश्टर स्केलच्या ११९ आणि ३ ते ४ रिश्टर स्केलच्या ९ धक्क्यांचा समावेश होता. भूकंपांच्या मालिकेमुळे नागरिक भयभीत झाले होते.

हेही वाचा-Goa Assembly Elections 2022 : गोवा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, जाणून घ्या... गोव्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा

ABOUT THE AUTHOR

...view details