सातारा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादीच्या सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा कोणत्या ठिकाणी घ्यायची, यासंदर्भात चर्चा करण्यात आली. मात्र सभेचे ठिकाण दोन दिवसांत सांगू असे उदयनराजेंनी सांगितले.
साताऱ्यात राज ठाकरेंच्या सभेसंदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांची उदयनराजेंबरोबर चर्चा - rally
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादीच्या सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
यावेळी उदयनराजे भोसले यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत आगामी लोकसभा निवडणुका आपला पक्ष लढवणार नसल्याचे जाहीर केले. पण कोणत्याही पक्षाला राज ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला नसला, तरी सेना-भाजप युतीचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज ठाकरे कोणत्या मतदारसंघात सभा घेणार. याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही. मात्र सातारा येथे ते लवकरच सभा घेणार असल्याचे धैर्यशील पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष सरचिटणीस उपस्थित होते.