महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maratha Reservation : मराठा आरक्षण न्यायालयात का टिकू शकलं नाही? पंकजा मुंडे म्हणाल्या... - पंकजा मुंडे मराठा आरक्षण प्रतिक्रिया

Maratha Reservation : पंकजा मुंडे शक्ती परिक्रमेदरम्यान माण- खटाव तालुक्यांत आल्या होत्या. त्यांनी कुलदैवत शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे दर्शन घेतले. तर मराठा आरक्षणाचा मसुदा व्यवस्थित नव्हता. त्यामुळे मराठा आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही, असा आरोप भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी केला आहे.

Maratha Reservation
पंकजा मुंडे

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 10:21 AM IST

Updated : Sep 7, 2023, 10:53 AM IST

प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे

सातारा :Maratha Reservation :जालना येथील लाठीहल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठे वक्तव्य (Pankaja Munde On Maratha Reservation) केलं आहे. मराठा आरक्षणाचा मसुदा व्यवस्थित नव्हता. त्यामुळं मराठा आरक्षण न्यायालयात टिकू शकलं नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) उपस्थित होते.



आरक्षणाचा मसुदा व्यवस्थित मांडला नाही :शिवशक्ती परिक्रमा करत पंकजा मुंडे या शिखर शिंगणापुरात आल्या होत्या. ( Pankaja Munde News ) त्यांच्या सोबत आमदार माधुरी मिसाळ होत्या. खासदार उदयनराजे भोसले यांच्या समवेत त्यांनी शंभू महादेवाला अभिषेक केला. यावेळी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मराठा आरक्षणाचा मसुदा व्यवस्थित मांडण्याचे काम संबंधित कमिटीने योग्य पध्दतीने केले नाही. कमिटीचा मसुदा निट असता तर मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळालं असतं. मसुदा ( ड्राफ्ट) निट नसल्यानेच न्यायालयात आरक्षण टिकलं नाही.



उदयनराजेंकडून तलवार देऊन स्वागत :पंकजा मुंडे यांनी शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाचे दर्शन घेऊन पूजा केली.(Shambhu Mahadev Temple ) माझे मोठे बंधू खासदार उदयनराजे भोसले यांनी माझा सन्मान करून लढण्यासाठी तलवार भेट दिली आहे. तिचा उपयोग उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी करेन. या तलवारीच्या जोरावर नक्कीच लढाई देखील जिंकेल. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.


शंभू महादेवाने शक्ती द्यावी :दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची अपुरी इच्छा आणि लोकसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शंभू महादेवाने मला शक्ती द्यावी, असे शंभू महादेवाला साकडे घातल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्ताने शिखर शिंगणापूर येथे त्यांचे ग्रामपंचायत आणि पळशी ग्रामस्थांच्या वतीने फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले.

हेही वाचा -

  1. Pankaja Munde On Maratha Reservation : मराठा आंदोलनाबाबत चौकशी झाली पाहिजे - पंकजा मुंडे
  2. Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; जरांगे पाटील आंदोलन मागे घेणार?
  3. Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी 'एल्गार'; २०० गावांनी घेतला 'हा' मोठा निर्णय
Last Updated : Sep 7, 2023, 10:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details