सातारा - कराड तालुक्यातील खंडाळा येथील महिला दक्षिण कोरियातील विद्यापीठात उच्च पदस्थ अधिकारी आहे. काही दिवसांपूर्वी महिनाभर सुट्टीवर खंडाळ्यात येऊन त्या पुन्हा विशेष विमानाने कोरियाला गेल्या. परंतु, तेथील तपासणीत त्या कोरोनाबाधित आढळल्या. कोरिया प्रशासनाने भारताच्या परराष्ट्र विभागाला ही माहिती दिली.
दक्षिण कोरियातील महाराष्ट्रीय महिला कोरोनाबाधित, साताऱ्यातून गेली होती परदेशात - satara women corona positive
कराड तालुक्यातील खंडाळा येथील महिला दक्षिण कोरियातील विद्यापीठात उच्च पदस्थ अधिकारी आहे. काही दिवसांपूर्वी महिनाभर सुट्टीवर खंडाळ्यात येऊन त्या पुन्हा विशेष विमानाने कोरियाला गेल्या. परंतु, तेथील तपासणीत त्या कोरोनाबाधित आढळल्या.
सातारा जिल्हा प्रशासनाला याबद्दल कळवण्यात आल्यानंतर संबंधित महिला अधिकाऱ्याच्या थेट संपर्कात आलेल्या 25 जणांना शिरवळ येथे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर, पाच जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. महिला २१ मार्चपासून २७ एप्रिलपर्यंत सासरी खंडाळा येथे वास्तव्यास होती. २८ एप्रिलला त्या दक्षिण कोरियाला रवाना झाल्या होत्या.
कोरियातील विद्यापीठाने भारतात असलेल्या सर्वांसाठी खास विमान पाठवून त्यांना कोरियाला नेले होते. तत्पुर्वी संबंधितांची मुंबई विमानतळावर कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे, त्या विशेष विमानाने कोरियाला गेल्या. मात्र, तिथे पोहोचल्यावर झालेल्या कोरोना चाचणीत त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.