महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात 1 जूनपर्यंत आणखीन कडक लाॅकडाऊन

साताऱ्यात आणखी कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. 1 जूनपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. मंगळवार मध्यरात्रीपासून निर्बंध लागू होणार आहेत.

satara
सातारा

By

Published : May 23, 2021, 8:50 PM IST

सातारा - कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. मंगळवारच्या (25 मे) मध्यरात्रीपासून निर्बंध लागू होणार असून त्याची अंमलबजावणी १ जूनपर्यंत चालणार आहे.

दुध फक्त घरपोच करण्यास परवानगी

या आदेशानुसार लॉकडाऊन कालावधीत परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहतील. दुध संकलन केंद्रे सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सुरु राहतील. फक्त घरपोच दुध वितरणास परवानगी असेल.

फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मिळणार पेट्रोल

शेतकऱ्यांना आवश्यक लागणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे, त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने उघडता येणार नाहीत. मात्र, फक्त सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत घरपोच सेवा देण्यास मुभा असेल. शिवभोजन थाळी योजनेतील फक्त पार्सल सुविधा सुरु राहील. पेट्रोल पंप फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा यासाठी, पेट्रोल पंप 24 तास चालू राहतील.

हे राहणार बंद

- सर्व दुकाने

- उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, दारु दुकान, मॉल, बाजार, मार्केट

- भाजी-फळं मार्केट, आठवडी व दैनंदिन बाजार, मंडई, फेरीवाले

- मटन, चिकन, अंडी, मासे विक्री

- रस्त्याच्या कडेला असणारी खाद्य पदार्थाची दुकाने

- सर्व बँका

हेही वाचा -पुण्यातील पहिले बाल कोविड सेंटर येरवडा येथे सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details