कराड (सातारा) - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे 5 फूट 3 इंचानी उघडण्यात आले असून 49 हजार 927 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठी पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. ऐन गणेशोत्सवात नद्यांची पाणी पातळी वाढल्याने घरगुती गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
कृष्णा, कोयना नदीकाठी अलर्ट; गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी प्रशासनाचा पुढाकार - महाराष्ट्रावर आस्मानी संकट
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे 5 फूट 3 इंचानी उघडण्यात आले असून 49 हजार 927 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठी पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. ऐन गणेशोत्सवात नद्यांची पाणी पातळी वाढल्याने घरगुती गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घाट परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी कोयना धरण जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातील विसर्ग रात्री वाढविण्यात आला आहे. धरणाच्या सांडवा आणि पायथा वीजगृहातून 49 हजार 927 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत देखील लक्षणीय वाढ झाली आहे.
घरगुती गणपतींचे विसर्जन सुरू आहे. परंतु, नद्यांची पाणी पातळी वाढत असल्याने पोलीस आणि महसूल प्रशासनाने नदीकाठी नागरीकांना मज्जाव केला आहे. घरगुती गणेशमुर्ती स्वत: संकलित करून प्रशासनामार्फत त्यांचे विसर्जन केले जात आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने नदीकाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.