कराड (सातारा)- दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या कराडचे ग्रामदैवत श्री कृष्णाबाईची चैत्री यात्रा लॉकडाऊनमुळे रद्द करण्याचा निर्णय उत्सव समितीने घेतला आहे. संचारबंदीमुळे यात्रा रद्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
लॉकडाऊन : कराडचे ग्रामदैवत कृष्णाबाईची चैत्री यात्रा रद्द
यंदा कोरोना संसर्गामुळे शासनाने गर्दीचे कार्यक्रम, यात्रा रद्द करण्याचे आवाहन केले आहे. तसेच संचारबंदी, जमावबंदी आहे. त्यामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे, असे मंदीर समितीचे विश्वस्त आनंद पालकर यांनी सांगितले.
कराडच्या श्री कृष्णाबाई यात्रेला मोठी परंपरा आणि इतिहास आहे. रामनवमीपासून यात्रेला प्रारंभ होतो. हनुमान जयंतीपासून पाच दिवस कृष्णाबाईची यात्रा साजरी होते. तसेच यात्रेनिमित्त दरवर्षी भजनाचे कार्यक्रम, व्याख्यान, नवचंडी याग, स्तोत्र पठण, संगीत कार्यक्रम हळदी-कुंकू, अभिषेक, महाप्रसाद, फटाक्यांची आतषबाजी आणि श्री कृष्णाबाईची पालखीतून नगरप्रदक्षिणा, यासारखे अनेक कार्यक्रम यात्रा समितीच्यावतीने व्हायचे. परंतु, यंदा सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.