सातारा- कोयना धरण परिसरात गुरुवारी रात्री 9.07 मिनिटांनी सौम्य स्वरुपाचा 3.1 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची नोंद झाली आहे.
कोयना धरण परिसरात 3.1 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का - Koyana
कोयना धरणाापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा धक्का बसला आहे. मागील आठवड्यात या परिसरात 3.05 रिश्टर स्केलचा धक्का बसला होता.
कोयना धरण
कोयना धरण परिसरात मागील महिन्यात देखील असाच सकाळी 8 च्या सुमारास 4 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवला होता. मागील आठवड्यात 3.05 भूंकपाचा धक्का जाणवला होता.
गुरुवारी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यातील जावळे गावच्या जवळ होता. आठ दिवसात कोयना परिसरात बसलेला हा दुसरा धक्का आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी व नुकसान झाले.