सातारा- मुलांना पळवून नेण्याच्या तयारीत असलेल्या 3 तृतीय पंथीयांच्या टोळीला महाबळेश्वर पोलिसांनी अटक केली. या टोळीने गळ्यावर चाकू ठेवून भीती दाखवत 4 मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलांनी त्यांच्यापासून आपली सुटका करत घरी पळून गेले.
लक्ष्मण शंकर कल्लेमोर (वय 50), बसुराज सायाप्पा काडमिची (वय 25), रमेश सिद्धीराम टोकूल (वय 28) या 3 तृतीयपंथीयांना पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा -साताऱ्यात विवाहितेचा विनयभंग; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी महाबळेश्वर शहरात 3 तृतीयपंथीयांनी शाळकरी मुलांना चाकूचा धाक दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, विध्यार्थ्यांनी स्वतःची सुटका करून घेऊन पळ काढला. घडलेला सर्व प्रकार त्यांनी आपल्या पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला.
महाबळेश्वरमध्ये मुलांना पळवणारी तृतीयपंथीयांची टोळी अटकेत यानंतर पालकांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देताच पोलिसांनी संबंधित आरोपींचा महाबळेश्वर शहरांमध्ये शोध घेतला. दरम्यान, बसस्थानकाच्या परिसरात संशयितरित्या फिरत असलेले हे 3 तृतीयपंथी पोलिसांना आढळले. तीन तृतीयपंथीयांना पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यामध्ये चौकशी केली. या संदर्भात सर्व माहिती घेतल्यानंतर त्या तिन्ही तृतीय पंथीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा -वन क्षेत्रात वणवा लावणाऱ्या महिलेस दंड