सातारा - कराडचे पोलीस अधिक्षक सूरज गुरव यांनी विद्यानगरमधील कॉलेज परिसरात रोडरोमिओसह, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, विना लायन्सस, मद्य प्राशन करून गाडी चालविणार्यांसह मॉडीफाय केलेल्या बुलेट, अशा 80 गाड्यांवर कारवाई केली. या कारवाईत 35 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार, वाहतूक शाखेचे कर्मचारी, निभर्या पथक आणि स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचार्यांचा सहभाग होता.
हेही वाचा - कसा का होईना पण मी चारवेळा उपमुख्यमंत्री - अजित पवार
चार महाविद्यालये, एक फार्मसी, एक इंजिनिअरिंग महाविद्यालय आणि आयटीआयसह शाळा असलेल्या कराडच्या विद्यानगर परिसरात कराडचे पोलीस अधिक्षक सूरज गुरव यांनी वाहतूक, गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि निर्भया पथकाच्या मदतीने कारवाईची मोहिम राबवून रोडरोमिओंसह, फॅन्सी नंबर प्लेट, दारू पिऊन तसेच विना परवाना गाडी चालविणे, सायलेंसरमध्ये बदल केलेल्या बुलेट गाड्याना दंड करण्यात आला.