महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराड उत्तरमधील परिवर्तनाची लढाई जिंकणारच - धैर्यशील कदम - karad north vidhansabha latest news

महायुतीची रसद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आशिर्वादामुळे कराड उत्तरमधील परिवर्तनाची लढाई आपण जिंकणारच, असा विश्वास शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला.

धैर्यशील कदम

By

Published : Oct 19, 2019, 4:20 PM IST

कराड (सातारा) - महायुतीची रसद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे कराड उत्तरमधील परिवर्तनाची लढाई आपण जिंकणारच, असा विश्वास शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला. कराड उत्तरमधील ग्रामीण भागात कदम यांनी झंझावाती प्रचार दौरा केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते भीमरावकाका पाटील, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, जितेंद्र पवार, समृध्दी जाधव उपस्थित होते.

हेही वाचा -उदयनराजेंना लोकसभेचं तिकीट देण्यात चूक झाली, भर पावसात पवार बरसले

पुसेसावळी गट हा धैर्यशील कदम यांचा बालेकिल्ला आहे. या गटात कोणी कितीही उड्या मारल्या तरी धैर्यशील कदम यांना विधीमंडळाच्या सभागृहात पाहण्याचे जनतेचे स्वप्न आहे, असे सांगून जितेंद्र पवार म्हणाले, पुसेसावळी परिसरातील काही नेते भरकटत आहेत. जनता मात्र धैर्यशील कदम यांच्याच पाठिशी खंबीर आहे, असे ते म्हणाले.

खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठबळामुळे कराड उत्तरमध्ये धैर्यशील कदम यांची ताकद वाढली आहे, असे सांगून समृध्दी जाधव म्हणाले, कराड उत्तरमध्ये समाविष्ट असणार्‍या सातारा तालुक्यातील नागठाणे, निसराळे, वर्णे, अपशिंगे मिलीटरी, अतीत या परिसरातील लोकमत महायुतीच्या बाजूने झुकले आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे.

हेही वाचा -लोकशाहीचा दुसरा स्वातंत्र्य लढा यशस्वी करा; पृथ्वीराज चव्हाणांचे आवाहन

विद्यमान आमदारांची गेल्या 20 वर्षातील कारकीर्द निष्क्रिय ठरली आहे. त्यामुळे गावोगावचे कार्यकर्ते आमदारांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत, असे सागर शिवदास म्हणाले. आमदारांवर नाराज असलेल्या सर्वांची मोट बांधली आहे. तसेच माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचाही कराड उत्तरमध्ये प्रभावी गट आहे. या गटाशीही आमचा समन्वय आहे. विद्यमान आमदारांविषयी मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा धैर्यशील कदम यांनाच होईल, असेही शिवदास म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details