महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ओगलेवाडी रेल्वे स्थानक परिसरात पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक - कराड शहर पोलीस न्यूज

कराड शहर पोलिसांनी ओगलेवाडी रेल्वे स्टेशन-एमएसईबी परिसरात पिस्तुल घेऊन संशयितरित्या फिरणार्‍या युवकाला गुरुवारी पहाटे अटक केली. संग्राम प्रल्हाद पवार, असे त्याचे नाव आहे.

Karad crime news
कराड क्राईम न्यूज

By

Published : Aug 7, 2020, 7:00 AM IST

कराड (सातारा) -ओगलेवाडी रेल्वे स्टेशन-एमएसईबी परिसरात पिस्तुल घेऊन संशयितरित्या फिरणार्‍या तरुणाला कराड शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली. संग्राम प्रल्हाद पवार (वय ३०, रा. हजारमाची, ता. कराड), असे त्याचे नाव आहे.

ओगलेवाडी रेल्वे स्टेशन-एमईसीबी रोडवर एक तरुण पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार ओगलेवाडी परिसरात सापळा रचला.

गुरुवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास संग्राम पवार हा एका रिक्षातून बनवडीकडे जात असताना दिसला. त्यावेळी पोलिसांनी रिक्षा थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तुल सापडले. याप्रकरणी पोलिसांनी संग्राम पवार याला अटक केली.

पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, हवालदार संग्राम पाटील, चव्हाण, होमगार्ड थोरात यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे हे पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details