सातारा- राज्यात राष्ट्रवादीला गळती लागली असली तरी साताऱ्यातचा बालेकिल्ला संभाळायला आम्ही तयार आहोत, अशी तयारी साताऱ्याच्या राजकारणातील मात्तबर राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्पनाराजे भोसले यांनी दाखवली.
साताऱ्याचा बालेकिल्ला संभाळायला आम्ही तयार - कल्पनाराजे भोसले
राज्यात राष्ट्रवादीला गळती लागली असली तरी साताऱ्यातचा बालेकिल्ला संभाळायला आम्ही तयार आहोत, अशी तयारी साताऱ्याच्या राजकारणातील मात्तबर राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्पनाराजे भोसले यांनी दाखवली.
शरद पवार साताऱ्यात मुक्कामी आहेत. शरद पवार साताऱ्यात दाखल झाल्यानंतर त्यांची कल्पनाराजेंनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. शिवेंद्रराजेंच्या जाण्याने सातारा शहरातली पोकळी दूर करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी शरद पवारांना दिले. सुमारे एक तास शरद पवार आणि कल्पनाराजे यांच्यात गोपनीय चर्चा झाली.
सातारा विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाबद्दल चर्चा झाली असल्याचे समजते. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे साताऱ्यात नसल्यामुळे त्यांना भेटले नाहीत, असे देखील सांगण्यात आले.