सातारा: यंदाचा शिवप्रतापदिन (Shiv Pratap Day) जिल्हा प्रशासनाच्यावतीने पारंपारीक आणि ऐतिहासिक वातावरणात (In traditional and historical environment) साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते प्रतापगडावर जरीकाठी भगवा फडकविण्यात येणार आहे. तसेच मर्दानी खेळ, लेझीम तसेच ढोलपथके, पोवाडा या पारंपारीक कार्यक्रमांसोबतच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. (Jarikathi flag will be hoisted on Pratapgad)
Shiv Pratap Day : शिवप्रतापदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतापगडावर फडकणार जरीकाठी भगवा; मर्दानी खेळाचे आयोजन - Chief Minister Eknath Shinde
यंदाचा शिवप्रतापदिन (Shiv Pratap Day) जिल्हा प्रशासनाच्यावतीने पारंपारीक आणि ऐतिहासिक वातावरणात साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रतापगडावर जरीकाठी भगवा फडकविण्यात येणार आहे. तसेच मर्दानी खेळ, लेझीम तसेच ढोलपथके, पोवाडा या पारंपारीक कार्यक्रमांसोबतच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. (Jarikathi flag will be hoisted on Pratapgad)
शिवप्रतापदिनाची यंदा जंगी तयारी:किल्ले प्रतापगडावर दि. 30 नोव्हेंबर रोजी शिवप्रतापदिन जल्लोषात साजरा केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. स्वराज्य विस्ताराचा पाया ज्या गडाच्या पायथ्याशी घातला, इतिहासातील सर्वात मोठा प्रताप घडविला, त्या किल्ले प्रतापगडावर अफजलखान वधाची तिथी दरवर्षी शिवप्रतापदिन म्हणून साजरी केली जाते. प्रशासकीय अधिकार्यांच्या बैठकीत शिवप्रतापदिन उत्सवाच्या तयारीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील या अधिकार्यांनी कार्यक्रमाच्या तयारीची माहिती पालकमंत्र्यांना दिली.
विद्युत रोषणाई, लेझर शो, मशाल महोत्सवासह मर्दानी खेळाचे सादरीकरण:प्रतापगडाला विद्युत रोषणाई, लेझर शो, मशाल महोत्सव तसेच आतषबाजीचे आयोजन केले जाणार आहे. प्रतापगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाणार आहे. प्रतापगडाकडे जाणार्या रस्त्यांची कामे तातडीने करून घेण्याची सूचनाही पालकमंत्री शंभूराज देसाईंनी (Shambhuraj Desai) प्रशासनाला केली आहे. शिवप्रतापदिन उत्सवात मर्दानी खेळ, लेझीम तसेच ढोलपथके, पोवाडा या पारंपारीक कार्यक्रमांसोबतच शासनातर्फे पोलीस मानवंदना देण्यात येणार आहे. सकाळी भवानी मातेची पूजा, अभिषेक व आरती त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम, शिवप्रतिमा पालखी पूजा, मिरवणूक, शिवपुतळ्यास जलाभिषेक, पूजा आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्यानंतर पोवाडा, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मर्दानी खेळांचे सादरीकरण होणार आहे. (Organization of masculine sports)