महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माणदेशी फाउंडेशन..! चारा टंचाईमुळे जनावरांसाठी त्यांनी सुरू केली खासगी छावणी.. - शासन

माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी स्वतःची खाजगी चारा छावणी सुरु केली. या छावणीत जनावरांना सावलीसाठी शेडची सुविधा करण्यात आली आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी दिवसाला ५ लाख लिटर उपलब्ध करून देण्यात येते.

माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांच्याशी चर्चा

By

Published : May 9, 2019, 2:59 PM IST

सातारा- शासनाने चारा छावण्या सुरू करण्यासाठी उशीर केल्यामुळे माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी स्वतःची खासगी चारा छावणी सुरू केली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यासंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी संवाद साधला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी महेश जाधव यांनी...

माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांच्याशी चर्चा

१ जानेवारीपासून चेतना सिन्हा यांनी खासगी चारा छावणी सुरू केली आहे. या छावणीत जनावरांना सावलीसाठी शेडची सुविधा करण्यात आली आहे. जनावरांना पिण्यासाठी दिवसाला ५ लाख लिटर उपलब्ध करून दिले जाते. यासोबतच छावणीच्या ठिकाणी कुटुंबासोबत राहिलेल्या दीडशे विद्यार्थिनींना माणदेशी फाउंडेशन व ओला फाउंडेशन यांच्यामार्फत सायकलही वाटप करण्यासारखे अनेक कौतुकास्पद उपक्रम माणदेशी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत आहेत.

परंतु, सध्या भीषण पाणीटंचाईमुळे पाणी नियोजन करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे या छावणीला भेट देणार आहेत. तसेच शासनातर्फे ही चारा छावणी सुरू ठेवण्याचे आश्वासनही देण्यात आल्याची माहिती यावेळी सिन्हा यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details