कराड (सातारा) - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी-जास्त होत आहे. चोवीस तासात धरणाच्या पाणीसाठ्यात पावणे तीन टीएमसीने (2.79) वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा आता 31.32 टीएमसी झाला आहे.
कोयना धरणाच्या पाणी साठ्यात पावणे तीन टीएमसीने वाढ
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणि पाण्याची आवक कमी-जास्त होत आहे. धरणात प्रति सेकंद 32222 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. रविवारी प्रति सेकंद 38194 क्युसेक पाण्याची आवक होत होती. पाणीसाठ्यात 3.30 टीएमसीने वाढ झाली होती. मात्र, पावसाचा जोर कमी-जास्त होत आहे.
चोवीस तासातील आवक घटली -धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणि पाण्याची आवक कमी-जास्त होत आहे. धरणात प्रति सेकंद 32222 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. रविवारी प्रति सेकंद 38194 क्युसेक पाण्याची आवक होत होती. पाणीसाठ्यात 3.30 टीएमसीने वाढ झाली होती. मात्र, पावसाचा जोर कमी-जास्त होत आहे.
नवजा येथे सर्वाधिक पाऊस -गेल्या चोवीस तासात पाण्याची आवक 32 हजारावर आली आहे. तसेच चोवीस तासात 2.79 टीएमसीने पाणी साठ्यात वाढ झाली आहे. रविवारच्या तुलनेत आवक आणि पाणीसाठ्यातील वाढ देखील घटली आहे. गेल्या चोवीस तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 177 मिलीमीटर, नवजा येथे 191 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 102 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ -दमदार पावसामुळे पाटण, कराड तालुक्यातील प्रमुख नद्यांसह उपनद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. कोयना नदीसह केरा, काफना, वांग, तारळी, कृष्णा, दक्षिण मांड, उत्तर मांड या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.