महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minor Girl Raped : मुलीची साडे तीन हजारात विक्री, लॉजवर नेवून बलात्कार; महिलेसह पुरूषावर गुन्हा दाखल - Child sexual abuse

एका महिलेने शेजार्‍याच्या 13 वर्षांच्या मुलीची ओळखीच्या इसमाला साडे तीन हजारात विकल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. विकल्यानंतर इसमाने लॉजवर नेऊन त्या मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती अमित कट्टीमणी (रा. कोडोली, ता. सातारा) आणि अनोळखी पुरूषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Minor Girl Raped
Minor Girl Raped

By

Published : May 7, 2023, 10:42 PM IST

सातारा :सातारकरांना हादरवणारी आणि पेन्शनर सिटीच्या लौकिकाला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना शहरात घडली आहे. एका महिलेने शेजार्‍याच्या 13 वर्षांच्या मुलीची ओळखीच्या इसमाला साडे तीन हजारात विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. विकल्यानंतर इसमाने लॉजवर नेऊन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती अमित कट्टीमणी (रा. कोडोली, ता. सातारा) आणि अनोळखी पुरूषावर गुन्हा दाखल झाला असून दोघेही फरारी आहेत.

फिरायला जायच्या बहाण्याने मुलीला नेले :बाहेरचे लोक येत येणार असून त्यांच्यासोबत फिरायला जायचे आहे, असे सांगून भारती कट्टीमणी या महिलेने त्या मुलीला सातार्‍यातील एका लॉजवर नेले. त्याठिकाणी 40 वर्षाच्या अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार ठरवून त्याच्याकडून साडेतीन हजार रुपये घेऊन मुलीला त्याच्या ताब्यात दिले. त्यानंतर ती तेथून निघून गेली. त्या इसमाने शाळकरी मुलीवर लॉजच्या खोलीमध्ये बलात्कार केला. मुलगी रडू लागल्यानंतर तिला दमदाटी करण्यात आली.

मुलीने आईला केला मेसेज :पीडित मुलीची आई बाहेरगावी होती. त्यामुळे मुलीने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती मेसेज करून आईला कळविली. मेसेज पाहिल्यानंतर आईने मुलीला तत्काळ फोन केला असता मुलगी रडायला लागली. तिने घृणास्पद प्रकाराची माहिती आईला सांगितली. घटना ऐकून आई देखील हादरून गेली. तातडीने तिने सातारा गाठत मुलीच्या वडिलांना माहिती दिली.

दबाव झुगारून मुलीच्या आईची पोलिसात धाव :पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणाच्याही दबावाला बळी न पडता नऊ दिवसांनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी भारती कट्टीमणी हिच्यासह त्या अनोळखी नराधमावर मुलीची विक्री करून जबरदस्तीने बलात्कार करणे, बाल लैंगिक अत्याचार कलमांन्वये गुन्हा दाखल केला. उपिनरीक्षक वाघमोडे हे या घटनेचा तपास करत आहेत.

संशयित सीसीटीव्हीत कैद :या घृणास्पद घटनेची सातारा पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपींच्या शोधासाठी दोन पथके विविध ठिकाणी रवाना केली. ज्या लॉजमध्ये संशयिताने मुलीवर बलात्कार केला, त्या लॉजमधील सीसीटीव्हीमध्ये नराधमाचा चेहरा कैद झाला आहे. दोन्ही संशयित सातारा शहरातून पसार झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांची दोन्ही पथके कसून त्याचा तपास करत आहेत.

हेही वाचा -

  1. Manipur Violence : महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना मणिपूरमधील शिवसेना कार्यालयात आसरा; मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
  2. Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीसंदर्भात शरद पवारांची मोठी भविष्यवाणी; भाजपचे टेन्शन वाढणार
  3. Sharad Pawar On Barsu : स्थानिक नागरिकांना विचारात घेऊन प्रकल्प उभे करावेत - शरद पवार

ABOUT THE AUTHOR

...view details