सातारा- गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वदुर पाऊस पडत आहे. त्या प्रमाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात मुसळधार पावसाचा जोर कायम
जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वदुर पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील पूर्व भागात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.
सोमवारी जिल्हा प्रशासनाने खबरदारीची भूमिका घेत माण तालुका वगळता जिल्ह्यातील सर्वच शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. कोयना धरणाचे सर्व दरवाजे 13 फुटाने उघडले आहेत. यातून 90,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृष्णा नदी काठच्या अनेक गावांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे. या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील एसटीचे अनेक मार्ग बंद असून, अनेक भागात पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कोयना, कास धरणं पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अद्याप कायम आहे.