सातारा - महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणार्या महाबळेश्वरमधील उंच असलेल्या विल्सन पॉईटवरील तीन बुरुजापैकी एक बुरुज मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. ( Wilson Point In Mahabaleshwar ) गेल्या आठ-दहा दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्याचा फटका या बुरूजाला बसला आहे.
महाबळेश्वरच्या सौंदर्याला पावसाचा तडाखा -विल्सन पॉईट हे महाबळेश्वरमधील महत्वाचे ठिकाण आहे. हा पॉईंट समुद्रसपाटीपासून सर्वात उंच आहे. याठिकाणी ब्रिटिशकालीन तीन बुरूज आहेत. हवामानाचा अभ्यास करण्यासह सूर्योदयाचा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी तीन बुरुज बांधण्यात आले होते. पहिल्या बुरुजाच्या दक्षिणेकडे पोलो ग्राऊंड, मकरंदगड आणि कोयना खोर्याचा आसमंत दिसतो. दुसच्या बुरुजावरून सुर्योदयाचे अप्रतिम दर्शन घडते. पूर्वेला पाचगणी शहर नजरेस पडते. तिसर्या बुरूजावरून महाबळेश्वरचे इतर पॉईंट, रांजणवाडी गाव आणि वेण्णा खोरे दिसते.