सातारा - खटाव माण तालुका तसा कायम दुष्काळीच संबोधला जातो. हा संपूर्ण तालुका खरीपाचा असून, येथील पिके पावसावरच विसंबून असतात. गेल्या वर्षीही खरीप हंगामातील पेरणीस उपयुक्त असा पाऊस झाला नव्हता. यंदा मात्र, वेळेवर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. या पावसामुळे यावेळच्या खरीपाच्या पेरण्या वेळेत होणार आहेत.
खटाव माण तालुक्याच्या पूर्व भागात दमदार पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण - माण खटाव न्यूज
सातारा जिल्ह्यातील खटाव माण तालुका तसा दुष्काळी संबोधला जातो. मात्र, या तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पावसामुळे यावेळच्या खरीपाच्या पेरण्या वेळेत होणार आहेत.
खरीप पिक हंगामातील विशेषत:, जिराईत क्षेत्रात बाजरी व कडधान्य पेरणीस हा अत्यंत व वेळेवर पडलेला पाऊस आहे. खटाव माण तालुका तसा कायम दुष्काळीच संबोधला जातो. या संपूर्ण तालुक्यात खरीपाची पिके घेतली जातात. या तालुक्याती पिके ही पावसावरच अवलंबून असतात. परंतु मान्सूनचा पाऊसच या तालुक्यात सहसा समाधानकारक पडत नाही. परिणामी, खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्याचे नियोजित वेळापत्रकच कोलमडते.
गेल्या वर्षीही खरीप हंगामातील पेरणीस उपयुक्त असा पाऊसच झाला नाही. याउलट सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे कोयना, कृष्णा, पंचगंगा नदीस पूर येऊन मोठे नुकसान झाले होते. नेमकी या उलट परिस्थिती माण तालुक्यात होती. गावोगावी टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यंदा मात्र मन्सूनच्या पावसाने मेहरबानी केल्यामुळे या तालुक्यात खरीपाच्या पेरण्या वेळेवर करण्याची संधी शेतकरी बांधवाना मिळणार आहे.