महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात पावसामुळे 22 हजार हेक्टर कृषी क्षेत्र बाधित; पाऊस असेपर्यंत पंचनामे सुरू ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश - minister balasaheb patil

जिल्ह्यात गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसामुळे 22 हजार 586 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. ज्यांचे क्षेत्र बाधित झाले आहे त्यांची संख्या 89 हजार 41 एवढी आहे.

meeting
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक

By

Published : Oct 26, 2020, 10:19 PM IST

सातारा - जिल्ह्यात गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसामुळे 22 हजार 586 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. ज्यांचे क्षेत्र बाधित झाले आहे त्यांची संख्या 89 हजार 41 एवढी आहे. पाऊस सुरु असेपर्यंत पंचनामे सुरू ठेवावेत, असे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, दिपक चव्हाण, महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थितीत होते.

नुकसान झालेल्या कामांची माहिती -

अतिवृष्टीने सातारा तालुक्यातील एकूण 1 हजार 109.72 हेक्टर, कोरेगाव तालुक्यात 503.20, खटाव तालुक्यात 2 हजार 994.71, फलटण तालुक्यात 3 हजार 765.05, माण तालुक्यात 9 हजार 298.26, वाई तालुक्यात 567.57, जावली तालुक्यात 435.60, खंडाळा तालुक्यात 232.78, महाबळेश्वर तालुक्यात 564.02, कराड तालुक्यात 1 हजार 48.95, पाटण तालुक्यात 2 हजार 66.03 असे एकूण 22 हजार 585.89 हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधित झाले आहे. अतिवृष्टीमुळे मालमत्तांचेही नुकसान झाले असून, यामध्ये रस्ते व मोऱ्या दुरुस्ती 470 कामे, नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती 45 कामे, प्राथमिक आरोग्य केंद्र पुळकोटी वीज पडल्याने स्लॅबची दुरुस्ती, स्मशानभूमी कट्टा/निवारा दुरुस्ती 17 कामे, इमारतीस तडे गेल्याने दुरुस्ती, पत्रा व दरवाजे दुरुस्ती 17 कामे, बंधारे दुरुस्ती 40 कामे, शाळा इमारतीस तडे गेल्याने दुरुस्तीची 3 कामे असे एकूण 590 नुकसान झालेल्या कामांची संख्या आहे.

अतिवृष्टीमुळे एकूण 105 गावातील खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. यामध्ये वडूज येथील 48 गावे व फलटण येथील 57 गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झालेल्या बाधित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळते. पण, अनेक ठिकाणी त्यापेक्षा कमी पाऊस होऊनही नुकसान झाले आहे. त्याबाबतीत शासनाला अवगत करावे, अशी मागणी सर्व आमदारांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी विनयकुमार गौडा तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details