सातारा(कराड ) - कराड परिसरात शुक्रवारी सायंकाळी वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह गारांचा पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उकाड्याने हैराण झालेल्या कराडकरांना दिलासा मिळाला.
विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्यांसह कराडमध्ये गारांचा पाऊस - वादळी वारे
कराड परिसरात शुक्रवारी तापमान चांगलेच वाढून दिवसभर उकाडा जाणवत होता. सायंकाळी मात्र वातावरणात बदल झाला. वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह गारांचा पाऊस पडला.
शुक्रवारी तापमान चांगलेच वाढून दिवसभर उकाडा जाणवत होता. सायंकाळी मात्र वातावरणात बदल झाला. वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू होऊन पावसाला सुरूवात झाली. उन्हाळ्यातील या पहिल्या वळीव पावसात भिजण्याचा आणि गारा वेचण्याचा आनंद लहान मुलांनी लुटला.
लॉकडाऊनमुळे सर्वजण आपापल्या घरात आहेत. त्यांनी पहिल्या वादळी पावसात भिजण्याबरोबरच गारा गोळा करण्याचाही आनंद लुटला. जवळपास तासभर या वळीव पावसाने कराड परिसराला झोडपले. वादळी वाऱ्यामुळे कराडच्या मंगळवार पेठेत झाडाची मोठी फांदी मोडून पडली.