सातारा: टोलनाका चुकवून कंटेनर पर्यायी मार्गाने जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कराड-मसूर रस्त्यावर सह्याद्री कारखाना परिसरात नाकाबंदी करून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी महम्मद ताजुद्दीन सैफुनसाब बालवाले (गुलबर्गा) आणि मेहबूब बाबुमिया (बिदर, कर्नाटक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
खबऱ्याच्या माहितीवरून कारवाई :गुटखा भरलेला कंटेनर कर्नाटकहून पुण्याकडे निघाला असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. टोलनाका चुकवून पर्यायी मार्गाने कंटेनर जाणार असल्याने तळबीड पोलिसांनी कराड-मसूर रस्त्यावर यशवंतनगर गावच्या हद्दीत सह्याद्री कारखाना परिसरात नाकाबंदी केली. पहाटे एक कंटेनर येताच पोलिसांनी कंटेनर थांबवून चालक आणि क्लिनरकडे चौकशी केली. दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरमध्ये गुटखा आढळून आला.
८४ लाखांचा गुटखा जप्त:कंटेनरसह चालक, क्लिनरला ताब्यात घेऊन कंटेनर तळबीड पोलीस ठाण्यात आणला. कंटेनरमधील गुटख्याची तपासणी केली असता सुमारे ८४ लाखांचा गुटखा आढळून आला. गुटखा आणि कंटेनर पोलिसांनी जप्त करून दोघांना ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
टोलनाका चुकवून गुटख्याची वाहतूक:महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक व विक्री होत आहे. कर्नाटकमधून गुटख्याचा मोठा साठा पुण्याकडे नेला जात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरुटे यांना मिळाली. तसेच महामार्गावरील टोलनाका चुकवून पर्यायी मार्गाने वाहन जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी सह्याद्री कारखान्याजवळ नाकाबंदी केली. या सापळ्यात गुटखा वाहतूक करणारा कंटेनर अडकला.
मुंबईतही गुटखा जप्त: मुंबईत तब्बल 61 लाख 36 हजार 132 रुपयांचा गुटखा 13 डिसेंबर, 2022 रोजी पोलिसांकडून जप्त करण्यात आला होता. पोलिसांकडून ट्रक आणि आणखी एक वाहन देखील जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली होती तर चार जण फरार झाले होते. रबाळे एमआयडीसी परिसरात गस्त घालत असताना एक संशयित ट्रक पोलिसांच्या पाहण्यात आला. ट्रकमध्ये पाहणी केली असता राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा असल्याचे निदर्शनास आले.
ट्रकचालक कारमध्ये बसून पळाला: रबाळे एमआयडीसी परिसरात गस्त घालत असताना एक संशयित ट्रक पोलिसांच्या पाहण्यात आला. ट्रकचालक व काही व्यक्तीचे बोलणे सुरू होते. या सर्व संशयास्पद हालचाली लक्षात आल्यावर ही बाब गस्त घालत असलेल्या पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना कळवली. त्यांनी तत्काळ गुन्हे प्रगटीकरण विभागाचे पथक रवाना केले. दरम्यान पोलीस पथकाने सापळा रचल्याचे लक्षात येताच ट्रक चालक शौकत आणि इतर चार जण एका कारमध्ये बसून पळून गेले. तर ज्याने ट्रकमधील माल घेतला तो पोलिसांच्या हाती सापडला. त्याचे नाव सागर गोहेल असल्याचे समोर आले. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालक शौकत याने माल दिल्याची माहिती दिली.
हेही वाचा:Solapur Crime: धक्कादायक! एकाच कुटुंबातील तीन महिलांची दगडाने ठेचून हत्या