सातारा -स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलिसांनी बुधवार पेठेमध्ये छापा मारून, विविध कंपन्यांचा गुटखा व वाहतुकीसाठी वापरलेली गाडी असा दहा लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शाहरूख उर्फ मुबीन अस्लम बागवान (रा. बुधवार पेठ, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मुबीन बागवान हा आपल्या घरात गुटख्याचा साठा करून ठेवणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बागवान याच्या घराच्या परिसरात सापळा लावला. बागवान याने वाहन क्रं. (एमएच 42 सी 4519) मधून विविध कंपनीचा गुटखा आणल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरावार छापा टाकला.