महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा: तासवडे टोलनाक्यावर साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - satara crime branch news

तासवडे येथील टोलनाक्याजवळ एका कारमधून सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साडेतीन लाखांचा गुटखा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पहाटे ही कारवाई केली.

gutka seized at taswade tolnaka in satara
सातारा: तासवडे टोलनाक्यावर साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By

Published : Nov 21, 2020, 4:15 AM IST

कराड (सातारा) -पुणे-बंगलुरू महामार्गावरील तासवडे येथील टोलनाक्याजवळ एका कारमधून सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साडेतीन लाखांचा गुटखा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पहाटे ही कारवाई केली. याप्रकरणी वैभव पावसकर आणि ओंकार देशपांडे यांना अटक करून तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे हे आपल्या पथकासह गुरुवारी रात्री सातारा-कराड महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास तासवडे टोल नाका परिसरातील उमा-महेश हॉटेलसमोर पांढऱ्या रंगाची वोक्सव्हॅगन पोलो कार क्रमांक एमएच १२ जीसी ५०६ ही संशयास्पदरीत्या रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे दिसले. कारमध्ये बसलेल्या दोघांकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आल्याने कारची तपासणी केल्यानंतर कारमध्ये गुटखा आणि सुगंधी पान मसाला आढळला. यावेळी पोलिसांनी साडेतीन लाखांचा गुटखा आणि कार ताब्यात घेतली.

हेही वाचा- 'किल्ले रायगडवर दुसरा रोप वे उभारणार'

ABOUT THE AUTHOR

...view details