महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली सातारा शहरातील उपाययोजनांची पाहणी - Satara Lockdown

जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी साताऱ्याला भेट देऊन प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. प्रशासन सतर्क आहे मात्र, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले.

Guardian Minister Balasaheb Patil
पालकमंत्री बाळासाहेब पाटील

By

Published : Apr 24, 2020, 8:29 AM IST

सातारा - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सहकार व पणन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी साताऱ्याला भेट देऊन प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.

सातारा शहरातील कोरोना उपाययोजनांची पाहणी करताना पालकमंत्री बाळासाहेब पाटील

शहरातील पोवई नाका, राजवाडा आणि बस स्थानक परिसर आदी ठिकाणांची पाहणी त्यांनी केली. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, तहसीलदार आशा होळकर, वाहतूक शाखेचे सहाय्यक निरिक्षक शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील हे यावेळी उपस्थित होते.

कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कारणांसाठी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. आरोग्य यंत्रणा संपूर्ण शहराचा होम टू होम सर्व्हे करत आहे. प्रशासन सतर्क आहे मात्र, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details