महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 18, 2020, 3:22 PM IST

ETV Bharat / state

साताऱ्यातील उद्योजकांनी स्थानिकांना रोजगार मिळवून द्यावा, पालकमंत्र्यांचे आवाहन

या मुंबईत सातारा जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात कामासाठी गेले होते. परंतु, लॉकडाऊनमुळे ते आपल्या जिल्ह्यात परतले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे, कोणतेही काम करण्याची त्यांची मानसिकता तयार झाली आहे. आज आणि उद्या होणाऱ्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उद्योजकांनी स्थानिकांना रोजगार मिळवून द्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

provide employment to locals
ऑनलाईन रोजगार मेळावा

सातारा- कोरोनाच्या प्रसारामुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद करण्यात आल्याने मुंबई, पुणे व परराज्यात काम करणारे मुळचे साताऱ्यातील नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. अशात येथील उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घेऊन स्थानिकांनाच रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात आले होते. याचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाला गृह (ग्रामीण) तथा कौशल्य विकास राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे आदी उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे आज उद्योग क्षेत्र काही प्रमाणात अडचणीत आले आहे. आता हे क्षेत्र पुन्हा उभे राहिले पाहिजे, ही शासनाची भूमिका असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पाटील पुढे म्हणाले, मुंबई ही राज्याची तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबईत सातारा जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात कामासाठी गेले होते. परंतु, लॉकडाऊनमुळे ते आपल्या जिल्ह्यात परतले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे, कोणतेही काम करण्याची त्यांची मानसिकता तयार झाली आहे. आज आणि उद्या होणाऱ्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उद्योजकांनी स्थानिकांना रोजगार मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केली.

1 हजार 277 जागांसाठी आज आणि उद्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. या जागांसाठी जिल्ह्यातून 4 हजार 500 जणांनी नोंदणी केलेली आहे. यापुढे उद्योगांना कामगारांची गरज असल्यास त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन किती कामगारांची गरज आहे, याची नोंदणी करावी, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.

उद्योजकांनी केले प्रशासनाचे कौतुक -

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील उद्योग बंद पडले होते. या काळात प्रशासनाने उद्योगाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच या काळात वेळोवेळी मार्गदर्शन करुन उद्योग सुरु करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. तसेच रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाईल, असे विविध उद्योगांच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details