सातारा- राज्यात पदवीधर मतदार नोंदणी चालू असतानाच यात मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका भाजपच्या बड्या नेत्याने पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक पतसंस्था, खासगी बँका यांना हाताला धरून पदवीधर मतदार नोंदणीसाठी कागदपत्रे गोळा करण्याचे काम एका वर्षापासून सुरू केले आहे. तर, ते कागदपत्रे गोळा करण्यासाठी पतसंस्था, बँका यांचे कर्मचारी कामाला लावले आहेत. गोळा झालेले फॉर्म व कागदपत्रे पुण्याला एका खासगी ऑफिसमध्ये नेऊन आपल्या संबंधीत असलेल्या पदवीधरांचे फॉर्म ठेवले जात आहेत. तर, इतर कागदपत्रे वेगळी केली जात आहेत. .
भाजपच्या नेत्यामुळे अनेकांना मुकावे लागणार 'पदवीधर' मतदानाला?
तहसीलदार कार्यालय तसेच प्रांत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी आपली कागदपत्रे द्यावीत. कोणत्याही खासगी संस्था तसेच बँका यांच्याकडे कागदपत्रे देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
यामुळे ज्यांनी बँक तसेच खासगी पतसंस्था यांना दिलेल्या फॉर्ममधील मतदारांची नावे पदवीधर मतदार यादीत येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हा प्रकार होत असताना भाजपचा बडा नेता यात सामील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सर्व सामान्य पदवीधर मतदार या मतदान प्रक्रियापासून लांब राहणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यावरती शासनाने लक्ष दिले असले तरी नागरिकांनी देखील लक्ष देणे गरजेचे आहे.
तहसीलदार कार्यालय तसेच प्रांत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी आपली कागदपत्रे द्यावीत. कोणत्याही खासगी संस्था तसेच बँका यांच्याकडे कागदपत्रे देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.