कराड (सातारा) - माथाडी कामगार नेते, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ नाही. मग शिवसेनेत थांबून काय करू? असा सवालही त्यांनी केला आहे.
माजी आमदार नरेंद्र पाटलांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र - नरेंद्र पाटलांबद्दल बातमी
माथाडी कामगार नेते, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ नाही. मग शिवसेनेत थांबून काय करू? असा सवालही त्यांनी केला आहे.
दिवंगत आमदार आण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र आणि माथाडी कामगारांचे झुंजार नेते, अशी ओळख असलेले नरेंद्र पाटील हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी राज्यभर चर्चेत आले होते. सातारा लोकसभा मतदार संघात खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेनेची उमेदवारी घेऊन त्यांनी जोरदार लढत दिली होती. अलिकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध निर्माण झाले आहेत. माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवेल तो आमचा नेता, असे सांगत नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला रामराम केला.
माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळच दिला नाही. शिवसेना-भाजप युतीचा उमेदवार म्हणून मी लोकसभेची निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढवली. परंतु मुख्यमंत्री ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पटत नसल्याने आमचेच हाल झाले. माथाडींच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नाही. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडत असल्याची प्रतिक्रिया नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.