सातारा : घराच्या बांधकामासाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीत बुडून पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना खंडाळा तालूक्यातील शिरवळ येथे घडली आहे. पार्थ प्रवीण चांगण (मूळ रा. खामगाव, ता. फलटण), असे मृत मुलाचे नाव आहे. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे शिरवळ शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
घराचे बांधकाम सुरू होते : प्रवीण चांगण हे कुटुंबासह शिरवळमधील चौपाळा याठिकाणच्या एका सोसायटीमध्ये राहतात. त्याच सोसायटीत सागर कोंडेकर यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. बांधकामाच्या पाण्यासाठी त्याठिकाणी टाकी बांधण्यात आली होती. खेळताना पार्थ हा पाण्याच्या टाकीत पडला. ही घटना निदर्शनास येताच तेथील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत पार्थला खासगी रूग्णालयात दाखल केले.
उपचारापुर्वीच झाला मृत्यू : शिवरळमधील खासगी रूग्णालयात नेल्यानंतर डॉक्टकरांनी पार्थला तपासले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने चांगण कुटुंबाला मोठा धक्का बसला. शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पार्थचे शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. प्रवीण चांगण यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवालदार संजय पंडित, अजित बोर्हाटे हे या घटनेचा तपास करीत आहेत.
नागपुरात चिमुरड्याचा मृत्यू : लहान बालकांकडे लक्ष देणे गरजेचे कारण महाराष्ट्रात अनेक घटना समोर येत आहेत. अलीकडेच नागपूरात देखील चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडली होती. हा चिमुकला खेळत असताना पाचव्या माळ्यावरून पडून मृत्यू झाला होता. नागपूरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. पाचव्या मजल्यावरून पडल्यावरदेखील त्याने आयुष्यासाठी संघर्ष केला होता. मात्र, डॉक्टारांना प्रयत्न करून देखील त्याला वाचविण्यात अपयश आले होते. शेख अहफाज (२) असे मृतक चिमुकल्याचे नाव होते. नागपूरातील शेख मोहरम उर्फ शेख ख्वाजा यांचा एकुलता एक मुलगा होता. २८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घरातच खेळत असताना तो खेळता खेळता बाल्कनीत गेला. तेथे तो गजाला पकडून उभा झाला दरम्यान त्याचा तोल गेला आणि तोल जाऊन तो थेट पाचव्या माळ्यावरून खाली पडला. यामध्ये त्याच्या अवयवांना जबर मार लागल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
हेही वाचा : Obscene MMS Threats : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महिला व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी