सातारा- जिल्ह्यात कोरोना संशयितांची वाढती संख्या लक्षात घेऊन सातारा-कराडसह वाई, कोरेगाव, फलटण येथे कोरोना केअर सेंटर उघडण्यात आली आहेत. या ठिकाणी संबंधित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेवून तपासणीसाठी पुढे पाठविले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील 5 शहरामध्ये कोरोना केअर सेंटर सुरु - mask
कोरोना संशयितांची वाढती संख्या लक्षात घेऊन सातारा-कराडसह वाई, कोरेगाव, फलटण येथे कोरोना केअर सेंटर उघडण्यात आली आहेत. या ठिकाणी संबंधित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेवून तपासणीसाठी पुढे पाठविले जाणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये रुग्णांची माहिती घेण्यात येत आहे. या रुग्णांमध्ये 'आयएलआय' (सर्दी, ताप, खोकला सदृष्य लक्षणे) व सारी (तीव्र सर्दी, ताप, खोकला असणारे रुग्ण ज्यांना दवाखान्यात दाखल करण्याची आवश्यकता आहे) या बाबतच्या रुग्णांची माहिती घेण्यात येत आहे. या मधील सारीची लक्षणे आढळून येणा-यांसाठी ही कोरोना केअर सेंटर काम करतील.या ठिकाणी संबंधीत रुग्णांच्या घाशातील स्त्रावांचे नमुने घेवून तपासणीसाठी पुढे पाठविले जाणार आहेत.
कोरोना संसर्गाचे गांभीर्य ओळखून होम क्वारंटाइनमध्ये रहावे. तसेच सर्दी, ताप, खोकला झाल्यास त्वरीत आरोग्य विभागाशी संपर्क करुन आरोग्य तपासणी करुन घ्यावी, जेणेकरुन त्यावर त्वरीत उपचार करण्यात येईल, असे आवाहनही संजय भागवत यांनी केले.
जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना, रुग्ण तपासणीकरीता डॉक्टरांना फेस शिल्ड, पीपीई किट, एन 95 मास्क, ट्रीपल लेअर मास्क व सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात वाटप करण्यात आलेले आहे. या साहित्यांची जिल्ह्यात कमतरता होणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले आहे.
या ठिकाणी कोरोना केअर सेंटर ( कंसात तालुके)
* क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा - (सातारा व जावली)
* उपजिल्हा रुग्णालय कराड - (कराड व पाटण)
* ग्रामीण रुग्णालय वाई - (वाई, खंडाळा व महाबळेश्वर)
* ग्रामीण रुग्णालय कोरेगांव - (कोरेगाव व खटाव)
* उप जिल्हा रुग्णालय फलटण - (फलटण व माण)