मुंबई - ज्या काळात, महिलांना वाहन चालवत नव्हत्या,तेव्हा साताऱ्यातील मराठी मुलगी सुरेख यादवने रेल्वे गाडी चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्या निर्णयामुळे भारतीय रेल्वेमध्येच नाही तर आशियातील खंडात पहिली महिला रेल्वे चालक म्हणून मान मिळवला आहे. सुरेखा यादवच्या या कार्यामुळे आज भारतीय रेल्वेत शेकडो महिला रेल्वे गाड्या चालवत आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारताचा हा विशेष रिपोर्ट......
Women's day special 2022 : भारताची नव्हे तर, आशिया खंडातील पहिली मराठी रेल्वे महिला चालक - महिला दिन विशेष
सातारा जिल्ह्याच्या एका शेतकरी कुटूंबात सुरेखा यादव यांच्या जन्म झाला. सुरेखाला लहानपणापासून शिक्षणाची ओढ असल्यामुळे तिने 1986 ला कराडच्या गव्हरमेन्ट पॉलीटक्निकमध्ये प्रवेश घेतला. अनेक वर्षांच्या अथक मेहनतीनंतर रेल्वेत मोटरचालक म्हणून सुरेखांची निवड झाली. मात्र, आयुष्यात काही तरी नवी करण्याचा स्वप्नाने सुरेखा पछाडली होती
womens day
सातारा जिल्ह्याच्या एका शेतकरी कुटूंबात सुरेखा यादव यांच्या जन्म झाला. सुरेखाला लहानपणापासून शिक्षणाची ओढ असल्यामुळे तिने 1986 ला कराडच्या गव्हरमेन्ट पॉलीटक्निकमध्ये प्रवेश घेतला. अनेक वर्षांच्या अथक मेहनतीनंतर रेल्वेत मोटरचालक म्हणून सुरेखांची निवड झाली. मात्र, आयुष्यात काही तरी नवी करण्याचा स्वप्नाने सुरेखा पछाडली होती. यासाठी मध्य रेल्वेकडून आणि सुरेख यादव यांच्या कुटुंबियांच्या पाठिंबव्यामुळे त्या आशिया खंडातील पहिली रेल्वे महिला चालक आहेत. सुरेखा यादव सांगतात की, आशिया खंडातील पहिली रेल्वे महिला चालक म्हणून मला अभिमान तर वाटतो. मात्र, त्यापेक्षाही यामुळे प्रेरित होत अनेक तरुण मुली रेल्वेमध्ये येण्यासाठी धाडस करत आहे. सुरेखा यादव या मध्य रेल्वेच्या मुंबईमधील उपनगरी सेवेतील पहिल्या महिला मोटर चालक, इंजिन ड्रायव्हर, लोको पायलट, असिस्टंट ड्रायव्हर तसेच ड्रायव्हर अशा अनेक हुद्यांवर काम करत आज ३२ वर्षाच्या रेल्वेसेवेत आहेत. सुरेख यादव मध्य रेल्वेत महिला मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.
असा सुरेखा यादव यांच्या प्रवास -
सुरेखा यादव यांनी ईटीव्ही भारताशी बोलताना सांगितले की, माझा रेल्वेचा प्रवासात सर्वप्रथम मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरचालक म्हणून निवड झाली. त्यानंतर सप्टेंबर 1989 मध्ये मालवाहू गाडीची सहायक इंजिन ड्रायव्हर म्हणून नोकरी स्विकारली. ते मार्च 1993 पर्यंत हे काम केले. मार्च 1993 ते ऑगस्ट 1993 पर्यंत इगतपुरी घाट तर सप्टेंबर 1993 ते एप्रिल 1994 मध्ये लोणावळा घाटात मेलला धक्का देणाऱ्या इंजिनचे सहायक ड्रायव्हर म्हणून काम केले. घाट विभागात रेल्वे गाडी चालवने फार कठीण असते. मात्र सिग्नल, स्थानक, गाडीचा वेग, सांधा बदलत असताना काळजी घ्यावी लागते. त्यामुळे दिवस असो वा रात्र. गाडी चालवतांना मला भीती वाटत नव्हती. ऑगस्ट 1994 ते मार्च 1995पर्यंत मालगाडी इंजिन ड्रायव्हरची जबाबदारी पार पाडली. तसेच मला सर्वप्रथम १९८८ मध्ये रेल्वेची पहिली महिला स्पेशल गाडी चालविण्याचा मान मिळाला आहे. यासाठी मला भारत सरकारतर्फे फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
रेल्वे आणि कुटुंबियांचा मोलाचा वाटा
तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती खुप वेगळी आहे. त्याकाळात महिलांचा शिक्षणाला फार महत्व दिले जात नव्हते. मात्र, त्यांनी माझा शिक्षणाला महत्व दिल्यामुळे मी येथवर पोहोचू शकले. याचे श्रेय मी भारतीय रेल्वेचा आणि कुटूबियांना गेते. कारण सुरुवातील एकटी महिला होते. मध्य रेल्वे प्रशासनाने आणि रेल्वेतील अधिकाऱ्यांचा मदतीमुळे मी आशिया खंडातील पहिली महिला रेल्वे चालकांचा मान मिळवला आहे. आता महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. असेही त्यांनी सांगितले.