महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोशल मीडियावर उद्धव ठाकरे, शरद पवारांची बदनामी; दोघांवर गुन्हा दाखल - satara latest news

महाविकास आघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी आकाश ठाकूर (रा. अमरावती) आणि रणजितसिंग राणा या दोघांवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

FIRs registered against 2 man for abusing uddhav thackeray and sharad pawar on social media
सोशल मीडियावर उद्धव ठाकरे, शरद पवारांची बदनामी; दोघांवर गुन्हा दाखल

By

Published : Nov 4, 2020, 11:53 AM IST

कराड (सातारा) - सोशल मीडियावर महाविकास आघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक अक्षय शिंदे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. आकाश ठाकूर (रा. अमरावती) व रणजितसिंग राणा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

काय आहे प्रकरण -
आकाश ठाकूर हा अमरावती येथील रहिवासी आहे. त्याचा सोशल मीडियावर ग्रुप आहेत. यात त्याने, मागील महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारची बदनामी होईल, अशा आशयाच्या पोस्ट आणि फोटो टाकले. या ग्रुपवर रणजितसिंह राणाने देखील काही पोस्ट शेअर केल्या.

ही बाब अक्षय शिंदे यांनी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन कुऱ्हाडे यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच त्यांनी या संदर्भात कऱ्हाड पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.

हेही वाचा -तर दुसरे सामाजिक पानिपत होईल, अन् इतिहास माफ करणार नाही : आ. शिवेंद्रसिंहराजे

हेही वाचा -फलटण बसस्थानकात महिलेचा खून; संशयितास अटक

ABOUT THE AUTHOR

...view details