सातारा -आनेवाडी टोलनाक्यावर रात्रीच्या सुमारास अज्ञात युवकांनी टोल न भरण्याच्या कारणावरून गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे.
आनेवाडी टोलनाक्यावर गोळीबार, एक जण जखमी - सातारा
गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले आहेत. गोळीबाराची घटना घडल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आनेवाडी टोल नाक्यावर मध्यरात्री स्विफ्ट (एमएच १२- एनजे ३०२) आणि फॉर्च्युनर (एमएच १२ केवाय ६४६६) या कारमधून आलेल्या काही लोकांनी टोल भरण्याच्या कारणावरून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. यानंतर काही वेळातच त्यांनी पिस्तूल काढून चार गोळ्या हवेत झाडल्या. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले आहेत. गोळीबाराची घटना घडल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना केले आहे.