सातारा- पालिकेचे उपमुख्य अधिकारी संचित कृष्णा धुमाळ (वय 32, सध्या रा.केसरकर पेठ, मूळ रा. जोगवडी ता. भोर, पुणे) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर नगरसेवक बाळू खंदारे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, दमदाटी, धक्का देणे या गुन्ह्यांचा तक्रारीत समावेश आहे. 13 डिसेंबरला खंदारे यांनी धुमाळ यांच्या कार्यालयात आंदोलन केले होते.
काय आहे प्रकरण -
१३ डिसेंबरला सकाळी 10 वाजता तक्रारदार संचित धुमाळ हे त्यांच्या केबिनमध्ये काम करत बसले होते. त्यावेळी नगरसेवक विनोद उर्फ बाळासाहेब खंदारे (रा.मल्हार पेठ) हे धुमाळ यांच्या केबिनमध्ये शौचालयाच्या पाण्याची बादली घेवून गेले. केबिनमध्ये आल्यानंतर खंदारे यांनी ती शौचालयाच्या पाण्याची बादली धुमाळ यांच्या टेबलवर ठेवली. या सर्व घटनेने उपस्थित अवाक झाले व तेथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली.