महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात 15 पॉझिटिव्ह तर, 12 जण कोरोनामुक्त - satara corona latest news

जिल्ह्यातील कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथून 5, कोव्हीड केअर केंद्र खावली येथून 4 व सह्याद्री रुग्णालय कराड येथून 3 असे एकूण 12 कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून दहा दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, कोरेगाव, पाटण व जावळी या तालुक्यातील प्रत्येकी 3, सातारा 2, खंडाळा-माण-कराड व, फलटण तालुक्यातील प्रत्येकी 1 असे एकूण 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

सातारा जिल्ह्यात 15 पॉझिटिव्ह
सातारा जिल्ह्यात 15 पॉझिटिव्ह

By

Published : Jun 3, 2020, 8:03 PM IST

सातारा - जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटरमधील 15 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातच, फलटण तालुक्यातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला तर 12 रुग्णांना कोरोनातून मुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

जिल्ह्यातील कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथून 5, कोव्हिड केअर केंद्र खावली येथून 4 व सह्याद्री रुग्णालय कराड येथून 3 असे एकूण 12 कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून दहा दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, कोरेगाव, पाटण व जावळी या तालुक्यातील प्रत्येकी 3, सातारा 2, खंडाळा-माण-कराड व, फलटण तालुक्यातील प्रत्येकी 1 असे एकूण 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबई येथे खासगी प्रयोगशाळेत तपासणी करून आलेल्या दिवड तालुका माण येथील 29 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या तिला क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर, फलटण तालुक्यातील कोळकी येथे मुंबईवरुन प्रवास करुन आलेल्या 54 वर्षीय कोरोना बाधितचा मृत्यू झाला आहे. वाई, फलटण व सातारा तालुक्यातील तिघांचे मृत्यू पश्चात घेण्यात आलेले नमुने निगेटिव्ह आले. एकूण 208 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून आणखी संभाव्य 2 मृत व्यक्तींसह सुमारे ४०० जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला पाठविले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 571 झाली असून 312 रुग्ण उपचार घेत आहेत. तर, कोरोनामुळे मृतांची संख्या 24 असून 235 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details