सातारा -कोरोनाच्या दहशतीमुळे देशभरात लॉकडाऊन सुरू असून व्यवहार बंद आहेत. शेती आणि शेती पूरक व्यवसायांवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसला आहे. साताऱ्यातील भाजी मार्केट बंद असल्याने अनेक शेतकऱयांचा माल शेतात पडून आहे तर अनेक ठिकाणी याची नासाडी देखील झाली आहे.
शेतकरी पुन्हा अडचणीत; लॉकडाऊनमुळे शेतीमाल पडून - सातारा ग्रामीण अर्थव्यवस्था
शेती आणि शेती पूरक व्यवसायांवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसला आहे. साताऱ्यातील भाजी मार्केट बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांचा माल शेतात पडून आहे तर अनेक ठिकाणी याची नासाडी देखील झाली आहे.
शेतकरी अडचणीत
भाजीपाला आणि फळे ही जीवनावश्यक बाबी आहेत. मोठी मार्केट बंद असल्याने या मालाची फक्त स्थानिक पातळीवर विक्री होत आहे. काही ठिकाणी फळ विक्रते आणि भाजीपाला विक्रते रस्त्याच्याकडेला आपला व्यवसाय करत आहेत. मात्र, मार्केट बंद असल्याने मोठ्या प्रमाणात माल शेतातच पडून आहे. शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.